तू निरागस चन्द्रमा ,आनंदी हा रवि
स्वप्न आहे का सत्य हे ,स्तब्ध आहे हा कवि ॥
नूर किती पुढे जातो , थांब जरा जर मी हवी
स्वप्न आहे का सत्य हे ,स्तब्ध आहे हा कवि ॥
झेप घेऊ झोप घेऊ ,मंद वार्या मध्ये ह्या नावी ॥
स्वप्न आहे का सत्य हे ,स्तब्ध आहे हा कवि ॥
सागर , फूले ,वारे सगळी अनुभूती ही नवी

Advertisements